रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (21:41 IST)

रायगडमध्ये विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्‍मक कारवाई नाही

राज्यात कोरोनामुळे निर्बंध आणि नियम कठोर करण्यात आले होते.मात्र संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रायगडमध्ये मास्क विसरला किंवा मास्कशिवाय फिरलात तर पोलीस कोणतीही दंडात्मक कारवाई करणार नाहीत. विना मास्क फिरणाऱ्यावर दंडात्‍मक कारवाई करू नका असे आदेशच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पोलिसांना दिले आहेत. नव्या आदेशानुसार सुरक्षा शाखेने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखा प्रभारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी यांना पत्र जारी केले आहे. 
 
कोरोनाची लाट ओसरल्‍यानंतर जिल्‍हा निर्बंधमुक्‍त झाला मात्र तोंडावरचा मास्‍क हटला नव्‍हता. मात्र आता रायगडकरांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे. आता मास्क विसरलात किंवा नसेल तरी पोलिसांची भीती बाळगण्याची गरज नाही.