शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रायगड , शनिवार, 5 मार्च 2022 (12:49 IST)

इंग्रजीच्या भीतीने रायगडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली. सानेगावमधील प्रकाश बांगारे (१७) या विद्यार्थ्याने इंग्रजीचा अभ्यास झाला नसल्याने नापास होण्याच्या भीतीने शुक्रवारी पेपर सुरू होण्यापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक तणावामुळे प्रकाशने हे टोकाचे पाऊल उचलले.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची १२ वीची ऑफलाइन परीक्षा शुक्रवारी ४ मार्चपासून सुरू झाली. दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा जवळपास बंदच आहेत. मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले. मात्र ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने आणि काही ठिकाणी इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची तयारी झालेली नाही. असे असताना ऑफलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इंग्रजीचा पेपर सुरू होण्यापूर्वी त्याने शाळेजवळच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून ते अधिक तपास करत आहेत.