1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (07:42 IST)

धाडसी आजी, बिबट्याच्या हल्ल्यातून वाचविले नातवाला

Brave grandmother
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते येथे बिबट्याच्या हल्ल्यातून नातवाला आजीने वाचविले आहे.  आजीच्या धाडसाचे सर्वदूर कौतुक होत आहे. सहा वर्षांच्या मुलावर बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्यानंतर आजीने बिबट्याचा प्रतिकार केला. याच वेळी बिबट्या बालकाला सोडून पळून गेला. बिबट्याने हल्ला केलेल्या बालकावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राप्त माहितीनुसार या मुलाचे आई वडील मजुरी करतात. ते माेलमजुरीसाठी दाेन तीन महिन्यांपासून नाशिकच्या बाहेर गेले असल्याचे आजीने सांगितले.
 
या घटनेत  राेशन बुधा खाडम (व 6, रा. कळमुस्ते, दुगारवाडी, त्र्यंबकेश्वर) असे जखमी मुलाचे नाव आहे. राेशन हा सायंकाळी सात वाजता घरात असताना अचानक एक बिबट्या घरात शिरला.बिबट्याने राेशनवर बिबट्याने हल्ला चढवत जबड्यात पकडून नेले. मात्र, आरडाओरड केल्याने त्याची आजी धावून आली. तिने बिबट्याचा प्रतिकार केला. यानंतर बिबट्या या मुलाला जबड्यातून सोडून निघून गेला.यानंतर ग्रामस्थांनी या मुलाला त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती नाजूक असल्याने या मुलाला नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटलला दाखल करण्यात आले आहे.