1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (16:28 IST)

कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाखांचा दंड

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात विझोरा येथे शासकीय ई-क्लास जमिनीतून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी उत्खनन करण्यात आले.  कोणतीही परवानगीशिवाय गौण खनिज उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला 21 कोटी 64 लाखाचा दंड ठोठावला आहे. समृद्धी महामार्गासाठी परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन करण्यात आले. या प्रकरणी कंत्राटदार कंपनीला तब्बल 21 कोटी 64 लाखांचा दंड सिंदखेड राजा तहसील कार्यालयाने ठोठावण्यात आला आहे. हा दंड न भरल्यास राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित कंपनीच्या देयकातून तेवढी रक्कम वगळण्यात येईल असे ही आदेश तहसीलदारांनी दिले आहे. पॅकेज सात चे कंत्राट घेतलेल्या रोडवेज इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनी ने गेल्या वर्षी 38 हजार 994
.216 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केले होते. या संदर्भात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मोजमाप केल्यावर हा प्रकार उघडकीस आल्याचे म्हटले आहे. या प्रकरणावर कारवाई करत कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला आहे.