सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (13:43 IST)

केरळच्या तरुणाला लागली अबूधाबीत 20 कोटीची लॉटरी

असं म्हणतात की 'देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो',. असचं काही घडले आहे केरळच्या एका तरुणांसह केरळचा रंजीत वेणूगोपालन हा तरुण गेल्या 12 वर्षांपासून ओमान मध्ये स्थायिक आहे. त्याला चक्क 20 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यांनी ही रकम लॉटरीच्या तिकिटाने जिंकली आहे. त्याने हे तिकीट दुसऱ्यांदा विकत घेतले असल्याचे सांगितले आहे. त्याच्या मित्रांनी त्याला हे तिकीट घेण्यास भाग पडले. तो लॉटरीमध्ये जिंकलेली ही रक्कम आपल्या पाचही मित्रांसह शेअर करणार असल्याचे सांगितले आहे. आपल्या मित्रांमुळेच त्याला एवढी मोठी लॉटरी लागली आहे. असे त्यानी सांगितले.