गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 डिसेंबर 2021 (17:54 IST)

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

Veteran journalist Vinod Dua passed away at the age of 67ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या निधनाची वार्ता कौटुंबिक सूत्रांनी दिली. विनोद दुआ हे हिंदी पत्रकारितेतील एक प्रसिद्ध चेहरा होते. 
दुआ यांना काही दिवसांपूर्वी यकृताच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 5 दिवसांपासून ते अपोलो हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. दुआ यांच्या पश्चात दोन मुली आहेत. दुआच्या पत्नीचा या वर्षी जूनमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला होता. दुआ यांनी देखील कोरोनाशी लढा दिला होता आणि तेव्हापासून त्याचे शरीर अधिकाधिक कमकुवत होत गेले. दुआ यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी 12 वाजता लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.