सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 5 जून 2022 (10:07 IST)

शरद पवार आणि शिवसेनेने एकत्र यावं ही बाळासाहेबांची भूमिका होती - संजय राऊत

sanjay raut
शिवसेना आणि शरद पवार यांनी एकत्र येण्याबाबत बाळासाहेब ठाकरे यांचीही भूमिका होती. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावं, देशाचं नेतृत्त्व करावं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व आम्ही करू, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
 
पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान संजय राऊत यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी संजय राऊत यांना विचारण्यात आलं की महाविकास आघाडीचा प्रयोग बाळासाहेबांना आवडला असता का?

यावर ते म्हणाले, 'नक्की आवडला असता. मुळात बाळासाहेब असते तर त्यांची असं काही करायची हिंमत झाली नसती. बाळासाहेबांना ते चळाचळा कापायचे. मातोश्रीवर येण्याआधी दहावेळा विचार करायचे. आता परिस्थिती बदलली आहे असं नाही. पण आता शिवसेनेचे नेतृत्व टोकाचे सुसंस्कृत. पण आमच्यावर बाळासाहेबांचा प्रभाव आहे.'
 
तसंच पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत असंही म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशांचं नेतृत्त्व करावं आणि आम्ही महाराष्ट्राचं करू.
 
देशात विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद आणि क्षमता शरद पवार यांच्यात आहे. पण, मी पंतप्रधान पदाविषयी बोलत नाहीय, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि पंतप्रधानपदाचा विषय 2024 चा आहे.