बाबासाहेब पुरंदरेंनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला - जितेंद्र आव्हाड  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  गेल्या काही दिवसांपासून दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखानावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीनं त्या वादावरुन अनेकदा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका आणि आरोप केले आहेत. स्वत: शरद पवार यांनी देखील नाशिकमध्ये पत्रकार परिषदेतून या मुद्दयावर आपली बाजू मांडली होती. त्यातच आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहासा नासवला असं म्हटलं आहे. कनेक्ट महाराष्ट्र काँक्लेव्ह कार्यक्रमाच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
				  													
						
																							
									  
	 
	जितेंद्र आव्हाड म्हणाले 'बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला. हे जेव्हा आम्ही महाराष्ट्रात बोलत होतो तेव्हा तो जेम्स लेन काही बोलला नाही. 20 वर्ष कुणी काही बोलत नाही, मात्र बाबासाहेब पुरंदरेंच्या मृत्यूनंतर तो जेम्स लेन सांगतो की, मला बाबासाहेब पुरंदरेंनी माहिती दिली नव्हती. मला पुण्यातून ही माहिती भेटली होती. इमेलद्वारे त्यानं ही माहिती पाठवली. ही माहिती कोणी दिली? मात्र हीच माहिती पुरंदरेंनी आपल्या इतिहासात लिहीली आहे' असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला. आव्हाड पुढे म्हणाले की, 'पुरंदरेंनी लिहीलं मराठे आपलं राज्य, जमिनी वाचवण्यासाठी आपल्या आईलाही पाठवायला कमी जास्त करणार नाही.'