शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पिंपरी चिंचवड , रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (20:10 IST)

बाहुलीला फाशी देत घेतला गळफास

suicide
पुणे जिल्ह्यात आई कामात व्यस्त असताना आठ वर्षांच्या चिमुरड्याने आधी बाहुलीला गळफास लावून घेतला आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
 
 त्याने बाहुलीचा चेहरा कापडाने झाकून ठेवला, जसा कैदी फाशी देण्यापूर्वी आपला चेहरा झाकतो. बाहुली त्याला सोडून गेल्याचे समजल्यानंतर त्या मुलाने स्वतःच्या गळ्यात दोरी बांधून तिला मिठी मारली आणि गळफास घेतला. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीतील थेरगाव परिसरातील आहे.
 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा मुलगा आपल्या बाहुलीसोबत खेळत होता. त्यावेळी त्याचा लहान भाऊ आणि बहीणही जवळच खेळत होते. त्यावेळी मुलाची आई कामात व्यस्त होती. तर, वडील कामानिमित्त बाहेर गेले होते.
 
 घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता मुलगा मोबाइलवर ‘हॉरर’चित्रफीत पाहत असल्याचे समोर आले.