बुधवार, 28 सप्टेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified बुधवार, 29 जून 2022 (12:32 IST)

माजी महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र, जीवे मारण्याची धमकी

मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याचं धमकीच पत्र रायगड येथून आलं आहे. त्यांना असं धमकीच पत्र तिसऱ्यांदा आले आहे. या पत्रातून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आले आहे. सरकार पडल्यावर बघून घेण्याची भाषा या पत्रात केली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे की या पत्राद्वारे अजित पवार यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं म्हटलं आहे. 

पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ करण्यात आली आहे. एवढंच नाही तर या पत्रातून बलात्काराची धमकी देखील देण्यात आली आहे. धमकीचं पत्र आल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. या पूर्वी देखील त्यांना फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.