शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 29 जून 2022 (10:28 IST)

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 19 वर

building collapses in Naik Nagar
कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 19 वर पोहचला आहे. तर 12 जण जखमी असून, त्यामधील चार जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरातील नाईकनगर सोसायटी नावाची चार मजली इमारत मध्यरात्री कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफची तुकडी दाखल झाली होती. रात्रीपासून बचावकार्य सूरू आहे. ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामधील 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

आणखी काहीजण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बीएमसी, अग्निशमन दल आणि एनडीआरएफ पथकाच्या वतीनं या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुर्ला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचेही निर्देश दिले आहेत