मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : शुक्रवार, 23 जुलै 2021 (11:01 IST)

मुंबई: गोवंडी येथे भीषण अपघात, इमारत कोसळल्याने तिघांचा मृत्यू

Mumbai: Three killed in a building accident at Govandi Maharashtra News Mumbai News In Marathi webdunia Marathi
मुंबईच्या शिवाजी नगरच्या गोवंडी येथे पहाटे एक वेदनादायक दुर्घटना घडली. इमारत कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 10 लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहिती व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार,आणखी काही लोक ढिगाऱ्या खाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
 
मुंबईत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 
 मुंबई आणि आसपासच्या भागात गेल्या पाच दिवसांपासून पावसामुळे सतत जन जीवन विस्कळीत झाला आहे.पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची परिस्थिती आहे. प्रशासनातर्फे पाणी काढण्याचे काम सुरू आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) 24 व 25 जुलै रोजी येथे यलो अलर्टचा इशारा  दिला असून अनेक भागात मुसळधार पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला आहे. मुसळधार पावसामुळे पुणे आणि रायगडमध्ये दरडी कोसळल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
 
संततधार पावसामुळे पूरस्थिती
संततधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. रायगड,रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्या धोक्याच्या चिन्हाच्या वर ओसंडून वाहत आहेत.सातारा,सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ दल तैनात करण्यात आल्या आहेत. पूरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी गुरुवारी रात्रीपासून सैन्य व नौदल सुरू करण्यात आले. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलून पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला.  
 
पावसामुळे गाड्या रद्द झाल्या
हवामान खात्यानुसार,गुरुवारपासूनच अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाड्याही वळविण्यात आल्या आहेत.