शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (10:42 IST)

Rain Update | मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका

मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय; मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका. पावसाचा उपनगरीय रेल्वे सेवेला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. मुंबईत आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता. गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या ट्रॅकवर अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होताना दिसली होती. यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. आज सकाळपासून मुंबईत पावसाचा जोर कमी असला तरी हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे विविध रेल्वे स्थानकांवरही मोठ्या संख्येने प्रवासी अडकले आहेत. या सर्वांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था रेल्वे करत आहे. दुपारपासूनच रेल्वे सेवा पुन्हा सुरू होऊ शकते, असेही बोलले जात आहे.