Daily Horoscope

आदित्य ठाकरेंची ड्रग टेस्ट करा : नीलेश राणे

Updated: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (13:24 IST)
 
सुशांत प्रकरणात (Sushant Singh rajput) कंगना राणावत हिनं सुरुवातीला बॉलिवूडमधील घराणेशाही व कंपूशाहीवर हल्लाबोल केला होता. मात्र, या प्रकरणाला राजकीय वळण लागल्यानंतर तिनं मुंबई पोलीस व राज्य सरकारवर टीका सुरू केली होती. आता या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर तिनं बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांना लक्ष्य केलं होतं.
 
रणवीर सिंह, रणबीर कपूर, अयान मुखर्जी आणि विकी कौशल यांनी ड्रग टेस्ट करून घ्यावी, अशी मागणी तिनं केली होती. हे चौघे कोकेनच्या आहारी गेल्याच्या चर्चा आहेत. त्यांनी टेस्ट करून ह्या अफवांना उत्तर द्यावं. असं करून ते लाखो तरुणांसमोर एक उदाहरण ठेवू शकतात, असं ट्वीट तिनं केलं होतं. कोणत्याही कलाकाराला राष्ट्रीय पुरस्कार देण्यापूर्वी त्याची ब्लड टेस्ट करावी, असंही ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
 
कंगनाच्या ह्याच मागणीच्या अनुषंगानं नीलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'केवळ रणवीर आणि रणबीरच कशाला? आदित्य ठाकरे यांनीही ड्रग टेस्ट करावी. शेवटी बॉलिवूडमधील अंतर्गत वर्तुळात त्यांचाही वावर असतो,' असं नीलेश राणेंनी म्हटलं आहे. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments