गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (14:47 IST)

आरिफ पठाण यांची गणेश मूर्ती मोफत घरपोच सेवा

कोल्हापूरमध्ये गणेश भक्त असलेल्या आरिफ पठाण यांनी यंदाही गणपती मूर्ती घरपोच पोहोचवण्यासाठी मोफत रिक्षा सेवा सुरु ठेवली आहे. घरपोच गणपतीसाठी मोफत रिक्षा देण्याचं हे त्यांचं यंदाचं सातवं वर्ष आहे. 
गणेश चतुर्थीनिमित्त  दिवसभर गणेश मूर्ती  मोफत घरपोच  पोहचवण्याचा हा उपक्रम आहे.  यंदा या उपक्रमात 20 रिक्षा सहभागी झाल्या आहेत.गेल्या दहा वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करतात. पाच वर्षांपूर्वी गंगावेश इथल्या कुंभार गल्लीत ते भाड्यासाठी थांबले होते. मात्र त्यावेळी रिक्षाचालक भाविकांकडून जादा भाडे आकारात होते. हे आरिफ यांना पटत नव्हतं. त्याचमुळे आरिफ यांनी सण-उत्सवाला मोफत रिक्षासेवा देण्याचा निर्णय घेतला.