सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 मार्च 2023 (07:50 IST)

रस्ता मजबुतीसाठी सुमारे 48 कोटीच्या निधीला मंजुरी

नाशिक लोकसभा मतदारसंघातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, नाशिक आणि सिन्नर या तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर होऊन दळणवळणासाठी रस्त्यांचे मजबुतीकरण व्हावे यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.सन 2023- 24 या अर्थसंकल्पात शासनाकडून वरील तालुक्यातील रस्त्यांच्या मजबुतीसाठी सुमारे 48 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेले आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करून दिलेल्या 48 कोटी रुपयांच्या निधीमुळे इगतपुरी तसेच इतर तीन तालुक्यातील रस्त्यांचे मजबूतीकरण होणार असून दळणवळण सुलभ तसेच विना आयास होणार आहे.याबरोबरच इगतपुरी,त्रंबकेश्वर या तालुक्यांमधील पर्यटन आणि धार्मिक क्षेत्राला मोठी चालना मिळण्यात असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
 
नाशिक लोकसभा मतदारसंघातील गावागावांमधील रस्ते मजबूत व्हावेत गाव रस्त्यांचे डांगरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे प्रयत्नशील होते. मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आदिवासी विभागाचे मंत्री विजयकुमार गावित यांची भेट घेतली होती. रस्त्यांची झालेली दुरावस्था विषयीच्या व्यथा खासदार गोडसे यांनी मंत्री महोदयांकडे मांडल्या होत्या. इगतपुरी आणि त्रंबकेश्वर या दोन तालुक्यांमध्ये रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने त्याचा पर्यटनावर किती आणि कसा परिणाम होतो हे खासदार गोडसे यांनी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिले होते.
 
खा.गोडसे यांची विकास कामांविषयीची तळमळ बघून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात इगतपुरी तालुक्यातील बारा रस्त्यांच्या कामासाठी तीस कोटी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चार रस्त्यांच्या कामांसाठी चौदा कोटी, नाशिक तालुक्यातील दोन रस्त्यांच्या कामांसाठी तीन कोटी तर सिन्नर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी एक कोटी असे एकूण ४८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.
 
या कामांमध्ये इगतपुरी तालुक्यातील भगुर- वंजारवाडी – मुंढेगाव रस्त्याच्या कामासाठी चार कोटी,
-भंडारदरावाडी -निनावी ते साकुर फाटा रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
-इंदोरे ते खडकेद रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
-एमडीआर २५ ते जामुंडे रोडच्या कामासाठी पाच कोटी,
-धामणगाव अडसरे बुद्रुक शिव ते ओडिआर १०२ च्या पूला पर्यंतच्या रस्ता कामासाठी चार कोटी,
-शणित जाधव वस्ती ते व्हिआर ९२ या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
-मोगरे ते मोगरेफाटा या रस्त्याच्या कामासाठी एक कोटीं,
-धामणी -बोराचीवाडी रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
-धामणी एप्रोच रोड ते व्हिआर-६ या दरम्यानच्या रस्त्यासाठी तीन कोटी,
-पिंपळगाव भटाटा ते वाळविहिर या दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी,
-अडवण ते अडवण फाटा या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
-कऱ्हाळे ते अवळी दुमाला या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
-नाशिक तालुक्यातील राजगडनगर ते दहेगाव रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी,
-वासळी ते दुडगाव रस्त्याच्या कामासाठी एक कोटी,
-सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे ते कासारवाडी रस्त्याच्या कामासाठी एक कोटी
-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेठ -तोरंगण-हरसूल – वाघेरा-आंबोली -त्र्यंबक घोटी या रस्त्याच्या कामासाठी आठ कोटी,
-आडगाव -गिरणारे -वाघेरा- हरसूल -ओझरखेड या रस्त्यासाठी सहा कोटी रुपये या रस्त्यांचा समावेश आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor