Last Modified रविवार, 31 जुलै 2022 (09:45 IST)
उदारमतवादी लोकशाही मजबूत करण्यातच भारताचं भवितव्य असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ज्ञ रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसच्या पाचव्या संमेलनात ते बोलत होते. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये प्रोफेशनल काँग्रेसचं हे संमेल पार पडलं.
तसंच, रघुराम राजन पुढे म्हणाले की, देशातील अल्पसंख्याकांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न देशाला विभागू शकतात.
देशात असं वातावरण असायला हवं, ज्यात प्रत्येक व्यक्तीला विकासाच्या संधी उपलब्ध असतील, असंही रघुराम राजन म्हणाले.