रविवार, 13 एप्रिल 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 एप्रिल 2025 (15:37 IST)

ठाण्यात बेकायदेशीर वसतिगृहात गैरवर्तन प्रकरण उघडकीस,29 मुलांची सुटका पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

crime
ठाणे जिल्ह्यात एका संस्थेद्वारे चालवणाऱ्या अनधिकृत वसतिगृहात होणाऱ्या गैरवर्तनच्या तक्रारी नंतर 29 मुलांची सुटका करण्यात आली आहे. अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी पोलिसांनी एका निवासी संस्थेतून 20 मुली आणि 9 मुलांची सुटका केली आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध बाल न्याय कायदा 2015 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
चाइल्ड हेल्पलाइन' ला गुरुवारी तक्रार मिळाली होती की संस्थेत मुलांना मारहाण आणि लैंगिक शोषण केले जात आहे. जिल्हा महिला आणि बालविकास कार्यालयाच्या पथकाने पोलिसांसह शुक्रवारी संस्थेची पाहणी केली आणि मुलांशी बोलल्यानंतर त्यांना आरोप खरे असल्याचे आढळून आले, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मुक्त केलेल्या मुलांना बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.
ठाणे जिल्हा दंडाधिकारी अशोक शिनगारे म्हणाले की, मुलांची सुरक्षा आणि कल्याण हे नेहमीच प्रशासनाचे प्राधान्य राहिले आहे. त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी अशा अनधिकृत संस्थांविरुद्ध पुढे येण्याचे आणि मुलांवर होणारे कोणतेही अत्याचार किंवा शोषण नोंदवण्याचे आवाहन लोकांना केले.