1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. accident at Yashwadi Hanuman Temple in Parbhani district

परभणी येथील हनुमान मंदिरात मंडपाचे छत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात असलेल्या यशवाडी हनुमान मंदिरात भीषण अपघात झाला. मंदिराचा सभामंडप अचानक कोसळल्याने साधारण 30 भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात आज,  भीषण अपघात झाला. प्रसिद्ध हनुमान मंदिराचा सभामंडप अचानक कोसळला. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली 30पेक्षा अधिक लोक अडकल्याची भीती आहे. प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत किमान 40 जण जखमी झाले आहे.
परभणीतील मानवत तालुक्यातील यशवाडीचे हनुमान मंदिर खूप प्रसिद्ध आहे. राज्यभरातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. याशिवाय शनिवारी अनेक भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात. त्यामुळे शनिवारी यशवाडीच्या हनुमान मंदिरात भाविकांची गर्दी असते. 
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर छत्रपती संभाजीनगर येथील पाच पर्यटक बुडाले