1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. accident between bus and truck on Malegaon Chalisgaon road

मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर एसटी बस आणि ट्रकची भीषण टक्कर; २ महिलांचा मृत्यू तर अनेक प्रवासी जखमी

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावर एक अत्यंत भीषण अपघात झाला आहे. एसटी बस आणि ट्रकची भीषण टक्कर झाली असून या अपघातात २ महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, २३ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पिंपळगाव वसंत आगाराची नाशिक-पाचोरा ही एसटी बस मालेगावहून चाळीसगावकडे जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकशी तिची  जोरदार धडकली.  यामध्ये दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिला जळगाव जिल्ह्यातील रहिवासी होत्या. 
तसेच बसमध्ये ५० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. चाळीसगावकडून येणाऱ्या आयशर ट्रक आणि एसटी बसचा वेग जास्त असल्याने हा अपघात अत्यंत भीषण होता, ज्यामध्ये दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केले. जखमी प्रवाशांना मालेगाव येथील  रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: पुढील दहा दिवसांत शाळेची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन सुरू करू अभिजीत दीपके यांचा अल्टिमेटम