शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 29 जून 2023 (07:38 IST)

पाटोदा तालुक्यात अपघात, ४ ठार

accident
पाटोदा : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात टेम्पो आणि कारची समोरासमोर धडक होऊन झाल्याने भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेत कार आणि टेम्पोचाही चुराडा झाला आहे. त्यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते. या दुर्घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
 
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात बुधवारी टेम्पो (क्र.एमएच २१ बीएच ३८२०) आणि कारची (क्र. एमएच १२ एफके ९०१०) यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोरात होती की, या अपघातात कार चक्काचूर झाला. तसेच टेम्पोचाही चुराडा झाला. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती मिळत आहे.