बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 25 जून 2023 (16:41 IST)

सातारा : ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात 4 ठार एक गंभीर

accident
साताऱ्यात ट्रॅक्टरच्या विचित्र अपघातात चार महिलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना साताऱ्यातील कारंडवाडी येथे घडली आहे. साताऱ्याच्या कारंडवाडी येथून शेतीतील कामे आटपून काही कामगार महिला जनावरांचा चारा घेऊन  ट्रॅक्टर ट्रॉलीने घरी परत जात असताना रस्त्यावर पावसामुळे झालेल्या चिखलमधून ट्रॅक्टर ट्रॉली निसरड्या रस्त्यामुळे अरुंद पुलावरून केनॉलमध्ये पडली. 

या अपघातात चार महिला मृत्युमुखी झाल्या. तर एक महिला जखमी झाली आहे. 
अलका भरत माने, अरुणा शंकर साळुंखे, सीताबाई निवृत्ती साळुंखे, लीलाबाई शिवाजी साळुंखे या मृत्युमुखींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धावत आले आणि त्यांनी मदत केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचुन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit