शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जून 2023 (13:22 IST)

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापूर्वी राडा

सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनापूर्वी ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन साहित्य फेकले आणि कंटेनर उलटा केला.या वेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी न्यायालयाच्या अवमान होऊ नये त्यासाठी पोलिसांसमोर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम थांबवण्याचे म्हटले होते. या दरम्यान कार्यक्रमस्थळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पोलीस आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत इमारतीच्या भूमिपूजनाचा नारळ फोडत सोहळा पार पाडला. 

आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी जे काही कायदेशीर असेल ते पोलिसांनी करावं असं म्हटले आहे. बाजार समितीच्या नावावर ही जागा आहे. न्यायालयात निकाल मार्केट कमिटीच्या नावाने लागले आहे. आम्ही  हे काम कायदेशीररित्या करत आहोत. त्यात आमचे काही चुकले असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करा.सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर आहे. न्यायालयाचे निकाल मार्केट कमिटीच्या बाजूने लागला आहे. असं म्हणत भूमिपूजनाचा नारळ फोडला. 

भूमिपूजनाच्या पूर्वी काही ग्रामस्थांनी कार्यक्रम स्थळी जाऊन कायर्कर्माचे साहित्य फेकले आणि कंटेनर उलटून दिला. या वेळी खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी पोहोचले. नंतर आमदार शिवेंद्रराजे हे देखील कार्यकर्त्यांसह पोहोचले. त्यावेळी आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यात धक्काबुक्की होऊन राडा झाला.  
 
Edited by - Priya Dixit