गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (19:13 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचे काका श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे निधन

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 वे  वंशज श्रीमंत शिवाजीराजे भोसले यांचे वृद्धापकाळाने पुण्याच्या एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री अदालत वाड्यात आणणार असून उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

छत्रपती शिवाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 वे वंशज होते. ते बऱ्याच दिवसापासून वृद्धापकाळामुळे आजारी होते.पुण्याच्या जहागीररुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज संध्याकाळी 5 :45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते राज्यसभाचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांचे काका होते.  शांत आणि संयमी व्यक्तित्वचे छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा निधनाने सातारा राजघराण्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.