सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:36 IST)

अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, महिलेला अटक

amruta fadnavis
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. महिलेने फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करत, अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. सायबर पोलिसांनी ठाण्यातून महिलेला अटक केली आहे.
 
अमृता फडणवीस यांनी ७ सप्टेंबरला फेसबुकला एक पोस्ट केली होती. त्या पोस्टवर एका युजरने आक्षेपार्ह शब्दात कमेंट करत शिवीगाळ केली होती. यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, या पोस्ट डिलीट करण्यात आल्या होत्या. तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता.
 
महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने अकाऊंट तयार केलं होतं. पोलीस तपासात आयपी अ‍ॅड्रेस आणि मोबाइल एका महिलेच्या नावावर असल्याचं निष्पन्न झालं. ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याचं समजल्यानंतर रात्री तिला तेथून अटक कण्यात आली. महिलेने याआधीही अनेकदा अशा पोस्ट केल्याची माहिती मिळत आहे.