शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 फेब्रुवारी 2022 (20:37 IST)

महिलेकडून बस चालकाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल, महिलेला अटक

एका महिलेने बस चालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला बस मध्ये चढून चालकाला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात आली आहे. 

ही घटना आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहरातील आहे. ही घटना विजयवाडा येथे 9 फेब्रुवारी रोजी घडली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका 28 वर्षीय महिलेला अटक केली आहे. के. नंदिनी असे या महिलेचे नाव आहे. 
 
ही महिला चुकीच्या दिशेने स्कुटी चालवत होती, असे सांगण्यात येत आहे. बस बाजूने काढण्यासाठी चालकाने महिलेला काही वेळ थांबण्यास सांगितले होते. या वरून चालकाचा महिलेशी वाद झाला. 

दरम्यान, महिलेने बस मध्ये घुसून चालकाला मारहाण  करण्यास सुरुवात केली. बस मधल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. एपी 11 झेड 7046 ही बस चालवणाऱ्या बस चालक मुसलैया(42) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सूर्यरावपेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि संबंधित कलमांखाली आरोपी महिलेला अटक केली.