रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:33 IST)

मुंबईला पाणीपुरवठा करणारा भातसा तलाव भरला

Bhatsa Canal
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी मोडक सागर, तानसा, तुळशी हे तीन तलाव १३ – १६ जुलै कालावधीत भरून वाहू लागले होते. तर विहार तलाव हा ११ ऑगस्टला भरून वाहू लागला होता. भातसा तलाव मंगळवार १३ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत १०० टक्के भरला आहे. विशेष म्हणजे अप्पर वैतरणा तलावात सध्या ९८.७३ टक्के पाणीसाठा जमा झाला असून या तलावांत पुढील २४ किंवा ४८ तासात चांगला पाऊस पडल्यास हा तलावही कोणत्याही क्षणी भरून वाहू लागेल.
 
त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एकूण पाच तलाव आता भरले असून सहावा अप्पर वैतरणा तलावही भरण्याच्या मार्गावर आहे. उरलेला फक्त एक तलाव म्हणजे मध्य वैतरणा तलावांत सध्या ९६.४५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला आता पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याचे टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही.