शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:46 IST)

नाशिक शहराच्या या भागात बुधवारी पाणी पुरवठा नाही

water tap
शहरातील सातपूर त्र्यंबक रोड, डेमोक्रेसी लॉन्स चौकातील 1200 मिमीच्या पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्ती कामी आज (23 ऑगस्ट) सकाळी सुरू करण्यात आले आहे. मात्र, कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात आहे. हे काम पुर्ण करण्यासाठी बुधवार (24 ऑगस्ट) सकाळपर्यंतचा कालावधी लागू शकतो.त्यामुळे या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या भागात बुधवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.
 
पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (२४ ऑगस्ट) खालील जलकुंभ भरता येणार नाहीत.१)सातपूर मनपा ऑफिस मागील दादासाहेब गायकवाड जलकुंभ,२)आठ हजार वसाहत जलकुंभ,३)हाउसिंग कॉलनी नवीन जलकुंभ,४)अमृतमणी जलकुंभ५)महात्मा नगर जलकुंभ,६)लवाटे नगर जलकुंभ७) तिडके कॉलनी श्री मंडळ जलकुंभवरील जलकुंभ भरता येणार नसल्याने  या जलकुंभावर आधारीत परिसरा बुधवार सकाळचा पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.