1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2022 (08:41 IST)

त्र्यंबकेश्वर :जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच केली आजीची हत्या

murder
लहानपणी जन्मदात्या आईपेक्षा आजीलाच नातवांची खूप काळजी आणि जबाबदारी सांभाळावी लागते. परंतु रक्तातल्या नात्याला हल्ली काळिमा फासला जात आहे. जेवायला दिले नाही म्हणून नातवानेच आजीची हत्याहातात घातलेल्या कड्यानेच केल्याची धक्कादायक घटना हरसूल गावातील इंदिरानगरमध्ये घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मयत झालेल्या आजीबाईचे नाव आहे.या घटनेने हरसूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
हरसूल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार हरसूल शहरातील इंदिरा नगर येथे मंगळवार (दि.२३)रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान घटना घडली असल्याचे समजले. कुटुंबातील गंगुबाई रामा गुरव (वय ७०) या आजीबाईच्या उजव्या डोळ्याजवळ नातू दशरथ रामा गुरव (वय २२) याने हातातील घातलेल्या कड्याच्या सहाय्याने वार केले आहेत.यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.तसेच हरसूल ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले.मात्र नातवानेचे लहानपणी कुरवणाऱ्या आजीचा जीव घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
या अगोदर ही हरसूल भागात अशीच घटना घडली होती.मात्र दुपार पर्यन्त हरसूल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरसूल पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक जनार्धन झिरवाळ,पोलीस कर्मचारी एस. सी.जाधव,पी.एम.जाधव अधिक तपास करीत आहे.