1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (08:23 IST)

वाईट काळ टाळायचा असेल तर या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नका

How can I increase my luck as per Vastu
तुम्ही अनेकदा वडिलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की, काही गोष्टी दुसऱ्यांचा मुळीच वापरू नये. वास्तुशास्त्रातही असे करण्यास मनाई आहे. वास्तूनुसार, इतरांकडून काही गोष्टी मागितल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते.
 
रुमाल- दुसर्‍या व्यक्तीकडून रुमाल घेतल्याने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. त्याला लोकांमधील मारामारी आणि वाद-विवाद याशी जोडून पाहिले जाते.
 
घड्याळ- वास्तुशास्त्रात घड्याळाचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेशीही आहे. मनगटावर दुसऱ्याचे घड्याळ घालणे फार अशुभ मानले जाते. असे केल्याने माणसाचा वाईट काळ सुरू होतो असे म्हणतात.
 
अंगठी- वास्तुशास्त्रात दुसऱ्या व्यक्तीची अंगठी मागवून परिधान करणे देखील अशुभ मानले जाते. असे केल्याने आरोग्य, जीवन आणि आर्थिक आघाडीवर वाईट परिणाम होतो.
 
पेन- वास्तुशास्त्रानुसार, आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचे कलम आपल्याजवळ ठेवू नये. हे केवळ करिअरच्या दृष्टीने अशुभ मानले जात नाही तर तुमचे पैसेही बुडू शकतात.
 
कर्ज- संक्रांतीच्या दिवशी कर्ज घेऊ नका, कर्ज फेडण्यात अनेक अडथळे येतात.
 
कंगवा- दुर्दैव टाळण्यासाठी केवळ कंगवाच नाही तर डोक्याशी संबंधित कोणतीही वस्तू शेअरिंगमध्ये वापरू नये.
 
कपडे- शास्त्रानुसार, कधीही दुसऱ्याचे कपडे घालू नयेत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, पण दैनंदिन जीवनात नको त्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते.