रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (09:03 IST)

केरसुणी ठेवण्याचे नियम आवर्जून पाळावे नाही तर...

वास्तू शास्त्रानुसार, केरसुणी किंवा झाडूबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम झाडूच्या देखभालीसाठीचे आहे. वास्तविक वास्तू विज्ञानाचा असा विश्वास आहे की झाडूच्या देखभाली बाबत ज्या चुका आपण करतो त्याचा थेट परिणाम आपल्या आर्थिक जीवनावर पडतो. कारण झाडू ही लक्ष्मीचे रूप मानले जाते. चला जाणून घेऊया झाडूच्या देखभालीसाठी कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे आहेत. 
 
1 वास्तुशास्त्रानुसार, झाडू वर कधीही पाय ठेवू नये. असे मानले जाते की यामुळे लक्ष्मी आई रागावून जाते आणि घरात दारिद्र्य येतं. झाडूचा अपमान हा लक्ष्मीचा अपमान मानला गेला आहे. 
 
2 घरात झाडू कधीही उलट्या बाजूने ठेवू नये. वास्तूच्या नियमानुसार, झाडू उलटी करून ठेवल्यामुळे कौटुंबिक कलह वाढतात.
 
3 झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेवू नये, किंवा घराच्या गच्चीवर देखील ठेवू नये. वस्तू नियमानुसार झाडूला घराच्या बाहेर किंवा गच्चीवर ठेवल्याने घरात चोरी होण्याची भीती असते.
 
4 झाडू नेहमी लपवून ठेवावी. वास्तू विज्ञानाचा नियम आहे की झाडू अश्या जागी ठेवावी जिथून घराच्या किंवा बाहेरच्या लोकांना दिसू नये. त्यामागील कारण असे की पैसा लपवूनच ठेवला जातो, त्याला सार्वजनिक करत नाही. 
 
5 स्वयंपाकघर किंवा आपण जेवण करत असलेल्या जागेवर किंवा त्याचा जवळपास चुकूनही झाडू ठेवू नये. तसेच जुना झाडू कधीही नवीन घरात घेऊन जाऊ नये. कारण वास्तुशास्त्रामध्ये हे अशुभ मानले जाते.
 
6 झाडू खराब झाली असल्यास नवी झाडू शनिवारीच घरात आणावी. हे शुभ मानले जाते. तसेच एखादे लहान मुलं एकाएकी घरात झाडू लावू लागत असेल तर आपल्या घरात पाहुणा येण्याची दाट शक्यता असते.
 
7 स्वप्नात आपल्याला कोणी झाडू घेऊन उभारलेले दिसल्यास हे शुभ सूचक आहे वास्तुशास्त्रात ह्याला सौभाग्याचे सूचक मानले जाते. अश्या लोकांचे नशीब बलवत्तर होतं.