बुधवार, 3 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 नोव्हेंबर 2025 (19:51 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसने दिली रुपाली पाटील ठोंबरे यांना पक्षशिस्तभंगाची नोटीस

Nationalist Congress Party
rupali thombare patil fesbook
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरील टिप्पणीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ठोंबरे यांचे हे विधान पक्षाच्या शिस्तीविरुद्ध असल्याचे पक्षाने म्हटले आहे. नोटीसमध्ये पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी रुपाली ठोंबरे यांना 7 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. 
काही दिवसांपूर्वी माधवी खंडाळकर यांनी सोशल मीडियावर रुपाली पाटील ठोंबरे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्ट वरून रुपाली ठोंबरे यांच्या  जवळच्या लोकांनी खंडाळकर यांना मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांनी दखल घेतली आणि चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल केलाचा आरोप केला. 
 
या प्रकरणी त्यांच्यावर पक्षशिस्तभंगाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या वर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य सरचिटणीस आमदार संजय खोडके यांनी ठोंबरे यांना नोटीस पाठविले आहे. 
नोटिशीत म्हटले आहे की, पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केलेली सार्वजनिक टीका पक्षशिस्तभंगास पात्र आहे. त्यामुळे आपल्या विरोधात कारवाई का करू नये, याचे स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.
Edited By - Priya Dixit