1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (15:38 IST)

शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

shirdi
राज्यातील प्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साई बाबा मंदिर विश्वस्त मंडळाबाबत औरंगाबाद खंडपीठाने महत्वाचा निकाल दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने शिर्डीतील साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव शेळके यांनी यासंदर्भातील याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. आता नवीन विश्वस्त मंडळाची नेमणूक होईपर्यंत जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत. अवघ्या एका वर्षात या मंडळाला पायउतार व्हाव लागले आहे.
 
त्याचबरोबर हे मंडळ बरखास्त झाल्यानंतर पुढील दोन महिन्यात नव्याने विश्वस्त मंडळ नेमण्याचे आदेश देखील औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राज्यभरामधून सभासद नेमण्यात येतात. १६ लोकांना या मंडळावर निवडण्यात येते.