एकनाथ शिंदेः 'दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा मोदी-शाहांचे हस्त होऊ
राज्यात मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दंड थोपटायला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पैठण येथे झालेल्या सभेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली.
ते म्हणाले, "निवडणुकीत आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून प्रचार केला होता. लोकांनी सत्तेतही आणले पण यांनी विरोधकांशी हातमिळवणी केली. भारताचा शत्रू असणाऱ्या मेमनच्या कबरीचे उदात्तीकरण या काळात झाले. मेमनचे हस्तक होण्यापेक्षा आम्ही मोदी-शहांचे हस्तक होऊ." या सभेत एकनाथ शिंदे यांनी अजित पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली.