ऋषिकेश मध्ये भाविकांचा अपघात, अपघातग्रस्त भाविकांचा मदतीला मुख्यमंत्री धावले
ऋषिकेश तीर्थयात्रेत गेलेल्या मुंबईच्या पालघर जिल्ह्यातील 18 यात्रेकरु ऋषिकेश येथे देवदर्शनासाठी गेले होते. या यात्रेकरुंच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातातर जितेश लोखंडे ( 43 वर्षे), धर्मराज खाटेकर ( 40 वर्षे), पुरुषोत्तम खिलखुटी ( 37 वर्षे), शिवाजी बुधकर (53 वर्षे) या चौघांचा मृत्यू झाला. तर 14 यात्रेकरू जखमी झाले.तर चौघा भाविकांचा कार कोसळून हृदयद्रावक मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली आणि जखमींना तातडीनं ऋषिकेशच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून दिली.
तसेच मृत्युमुखी झालेल्या मुंबईतील भाविकांचे पार्थिव राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ऋषिकेश मधून आणून नातेवाईकांकडे सुपूर्द केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या या दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांचे सहकारी सचिन जोशी यांना मिळताच त्यांनी तातडीने घटनेबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. अपघातातील मृतांचे शवविच्छेदन आणि इतर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्याचदिवशी रात्री दिल्ली विमानतळावर आणण्यात आले, तेथून पहाटे हे पार्थिव मुंबईत विमानाने आणण्यात आले, त्यानंतर लगेचच ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मुख्यमंत्र्यांचे सहयोग दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.