तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप,2 ठार
नवरात्रोत्सवचा सोहळा सुरु आहे. तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेऊन कोल्हापुरातील भाविकांवर काळाने झडप घातली आणि भाविकांच्या कारला पाठीमागून मालवाहू ट्रकने धडक देऊन अपघात झाला आणि या अपघातात दोंघांचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापुर जिल्ह्यातील नांदणी व वडगावचे पाच मित्र रविवारी सकाळी वॅगन कारने तुळजापूरच्या देवीच्या दर्शनावरून परत कोल्हापुरात येताना भरधाव वेगाने धावणाऱ्या कारला पाठीमागून मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली.आणि अपघात घडला.
हा अपघात सोमवार पहाटे 4 वाजेच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास तालुका सांगोलात घडला.अपघातात दोघे ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती सांगोला पोलिसांना मिळाल्यावर महामार्ग पोलीस आणि सांगोला पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
पोलिसांनी अपघातात चक्काचूर झालेली कार बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Edited by - Priya Dixit