संबंधित माहिती
- छापा की काटा
- राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री देणार; उद्धव ठाकरेंच्या विधानाने तर्कवितर्कांना उधाण
- कॅनडा करणार महाराष्टात मोठी गुंतवणूक; राज्य सरकारसोबत सामंजस्य करार
- स्टेट बँकेने मुंबईतील शाखांबाबतचा ‘तो’ वादग्रस्त निर्णय अखेर घेतला मागे
- खासगी सावकाराच्या तावडीतून शेतकऱ्यांना परत मिळाली १०० एकर जमीन; राज्यातील पहिलीच घटना
महामार्गावर एसटीचा भीषण अपघात
धुळ्यात आज सकाळच्या सुमारास एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही चाळीसगाव येथून प्रवाशांना घेऊन अक्कलकुवाकडे निघाली होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बस धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ आली, त्यात सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.विद्यार्थी आणि प्रवाश्यांना घेऊन ही बस धुळ्याकडे रवाना झाली. तरवडे गाव सोडून 2 किलोमीटर अंतरावर धुळ्याकडून चाळीसगावकडे भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने बसला हुलकावणी दिली. यावेळी बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जवळपास 20 प्रवासी जखमी झाले असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे.
Edited by : Smita Joshi
Edited by : Smita Joshi
