शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (15:11 IST)

पत्नीचं मुंडकं कापून हातात घेऊन गावभर फिरला माथेफिरु

crime
परभणी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत एका पतीने आपल्या पत्नीचं शिर कोयत्याने धडावेगळं करुन तिची निर्घृण हत्या केली. नंतर नराधम पती चक्क पत्नीचं धडावेगळं केलेलं शिर हातात घेऊन संपूर्ण गावभर फिरला. या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 
 
ही खळबळजनक घटना परभणीतील पूर्णा तालुकाच्या कमलापूर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार 43 वर्षीय केशव मोरेने कोयत्याने आपल्या पत्नीचा चेहरा विद्रूप करुन तिचं शिर धडावेगळे केलं. ही घटना मंगळवार रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले.
 
आरोपी एका हातात पत्नीचे मुंडकं आणि दुसर्‍या हातात कोयता घेऊन सुमारे अर्धा तास फिरत होता. यामुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं होते. मात्र पतीने पत्नीची का केली याचा उलगडा अद्याप झालेला नाही.