बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (12:57 IST)

Accidental death : गायीला वाचवताना चौघांचा अपघाती मृत्यू

प्रसिद्ध डीजे वादक पंकज बागडेसह 4 ठारभरधाव बोलेरो ट्रकवर आदळली चंद्रपूर जिल्ह्यातील सावली-गडचिरोली मार्गावर हा अपघात झाला.याप्रकरणी छाया पोलीस अधिक तपास करत आहेत.  
 
चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली गडचिरोली महामार्गावर रात्री पंकज बागडे आणि त्याचे सवंगडी घरी यायला निघाले होते. रात्री प्रवास करत असताना डिजेचं सामान घेऊन ते घर गाठण्याच्या प्रयत्न करत असताना सावली आणि किमान नगर जवळ त्यांच्या कारचा अपगात झाला. महिंद्रा बोलेरोने गरी परतण्यासाठी निघालेले पंकज आणि त्याचे मित्र जिवंत घरी परतूच शकले नाही. 
 
असा झाला अपघात 
बोलेरो गाडीतून परतत असताना रात्री रस्त्यावर एक गाय बसल्याचं चालकाच्या लक्षात आलं. गायीला वाचवण्यासाठी चालकानं स्टेअरींग जोरात फिरवलं. पण यात गाडीचा स्टेअरींग रॉडच तुटला आणि बोलेरो कार बाजूच्या ट्रकवर जोरात आदळली. यामुळे गाडीतील सर्वांना जबर मार बसला. काहींना डोक्यालाच मोठा भीषण मार बसला होता. 
 
कारचा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. सावली आणि किसान नगर येथील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केलं.