रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 जुलै 2022 (17:21 IST)

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू

पोलीस खात्यात भरती होण्याचं स्वप्न घेऊन पोलिसात भरती होण्याची तयारी करत असलेल्या दोन तरुणांवर काळाने झडप घातली आणि रस्त्यावर भरवेगाने येत असलेल्या वाहनाने त्यांना चिरडले आणि त्यांचा दुर्देवी अंत झाला. आणि त्यांचे पोलिसात भरती होण्याचं स्वप्न भंगले. ही दुर्देवी घटना आज सकाळी वसमत हिंगोलीच्या कवठा कुरुंदा रस्त्यालगत कालव्याजवळ घडली. दोन तरुण पहाटे पोलीस भरतीची तयारी करत होते .दररोज प्रमाणे हे दोघे सकाळच्या वेळी शारीरिक चाचणीचा सराव करत असताना धावण्यासाठी बाहेर पडले आणि वसमत -कवठा -कुरुंदा रस्त्यावरील कालव्यात वेगाने भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले त्यांचा जागीच मृत्यू झाला. गणेश परमेश्वरा गायकवाड(24), आणि अनिल भगवानराव आमले(18) असे मृत्युमुखी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळतातच वसमत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेऊन अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या तरुणांना चिरडून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. या घटनेची माहिती मिळतातच गावात खळबळ उडाली आहे.