1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 सप्टेंबर 2021 (14:59 IST)

जामीनावर सुटलेल्या आरोपीची बलात्कार पीडितेला धमकी, अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Accused released on bail threatens rape victim
नागपुरमध्ये एका 17 वर्षीय बलात्कार पीडित तरुणीने गाळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यापूर्वी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मिळाला होता.
 
पीडित तरुणी ही 11 वी वर्गात शिकत होती. मुलगी तिचे वडील, सावत्र आई आणि भावासोबत राहत होती. त्यांनी सांगितले की, तिने सोमवारी सकाळी जरीपटका परिसरातील त्याच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनमध्ये तिच्या सावत्र आईच्या नातेवाईकाने तिच्यावर कथित बलात्कार केला होता, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आरोपीला अटक केली गेली होती. विकास भुजाडे नावाच्या तिच्या नातेवाईकने फूस लावून तिचे अपहरण करुन तिला बंगळुरूला घेऊन गेला आणि लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला.
 
मुलगी बेपत्ता झाल्यावर आई-वडिलांनी नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोधाशोध करत पीडित तरुणीची सुटका केली होती आणि विकास बुजाडे याच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करत अटक केली. तीन दिवसापूर्वी विकास हा जामिनावर सुटला आणि नतर त्याने पीडित मुलीशी संपर्क साधून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. तेव्हापासून ती मुलगी डिप्रेशनमध्ये होती.
 
अत्याचार करून देखील आरोपी धमकी देतो आणि बाहेर मोकाट फिरत असल्याचे बघून पीडित तरुणीने घरात कोणीही नसाताना गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.