शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (08:19 IST)

धनेधर गँगच्या १७ सदस्यांवर अखेर मोक्कान्वये कारवाई

Action against 17 members of Dhanedhar gang Maharashtra News Regional Marathi News In Webdunia Marathi
नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात ४६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या धनेधर गँगच्या १७ सदस्यांवर अखेर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली. त्यात दोघा विधीसंवर्धीत (अल्पवयीन) मुलांचा समावेश आहे. शहर पोलीसानी संघटीत गुन्हेगारांवर वर्षभरात ही सहावी कारवाई केली आहे.
 
मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या धनेधर गँगच्या सदस्यांमध्ये सिध्या उर्फ सिध्दांत सचिन धनेधर,पेन्या उर्फ वैभव नितीन जाधव,आदित्य दिपक सावंत उर्फ छोटू दादा,सुरज बरूदी भारद्वाज,तेजस अनिल गांगुर्डे,अनिकेत राजू जॉन उर्फ केरला,ऋषीकेश अशोक निकम,प्रतिक राठोड,भिमा मनोज श्रीवंत,उमेश संजय बुचडे,उमेध दादाराव धोंगडे,नदिम उर्फ बडे पप्पू पठाण,हुसेन फिरोज शेख,शुभम उर्फ बाशी हरबीर बेहनाल,राहूल अजय उजैनवाल व दोन अल्पवयीन मुले यांचा समावेश आहे. सिध्या उर्फ सिध्दांत धनेधर हा या गँगचा म्होरक्या आहे.
 
या संशयीतांविरोधीत नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात ४६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, गेल्या ४ सप्टेंबर रोजी या टोळक्याने तलवार – कोयत्यांसारख्या धारदार शस्त्राचा धाक दाखवून महिलेच्या दुकानातील गल्यातील रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. यावेळी शेजारी दुकानदारास बेदम मारहाण करून परिसरात दहशत माजविली होती. या गुह्यातील ९ जणांसह टोळीतील ८ सदस्य अश्या १७ जणांवर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अन्वये ही कारवाई केली असून पुढील तपास सहाय्यक आयुक्त डॉ.सिध्देश्वर धुमाळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.