गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (20:54 IST)

ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना घेरलं

supriya sule
राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार संवाद मेळावा सुरु आहे. या दौऱ्यातील एक कार्यक्रम सांगलीतंही  पार पडला. याच कार्यक्रमादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार भाषण केलं. अमोल मिटकरी यांनी या भाषणात राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसंच त्यांनी पुरोहितांकडून म्हटल्या जाणाऱ्या मंत्रावर देखील काही वक्तव्य केलीत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वादात सापडला आहे. ब्राम्हण महासंघ यावरून आक्रमक झाला असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
 
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज पंढरपुर दौऱ्यावर होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राम्हण समाजाने आक्रमक होत सुप्रिया सुळेंना घेराव घातला. सुप्रिया सुळे या श्री विठ्ठल रुख्मिणी दर्शनाला आल्या असता त्याठिकाणी उपस्थित असलेल्या ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घातला घेराव. इस्लामपुरच्या सभेत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील, धनंजय मुंडे आणि अमोल मिटकरी यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी ब्राम्हण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.