सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:05 IST)

पुढील तीन दिवस पावसाचे, ‘या’ जिल्ह्यांना दिला अलर्ट

सध्या दिवसभर कडाका वाढला असून सायंकाळी गार हवा जाणवते आहे. अशातच आता २१ ते २३ एप्रिलपर्यंत जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. यातील 21 आणि २२ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे सुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर (Kolhapur), पुणे, सोलापूर, उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur), नांदेड (nanded) या जिल्ह्यांमध्ये २१ आणि २२ तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय बुलडाणा (Buldhana), वाशिम, अकोला (Akola), अमरावती, यवतमाळ (Yavatmal), वर्धा, चंद्रपूर, नागपूर (Nagpur), भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे. २३ तारखेलाही यापैकी काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, २० आणि २१ एप्रिल रोजी राजस्थान (Rajsthan) आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वेगळ्या ठिकाणी धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. २१ आणि २२ रोजी पूर्व उत्तर प्रदेशात आणि आज १९ एप्रिल रोजी राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार धूळ वाढवणारे वारे ताशी २५-३५ किमी वेगाने वाहण्याची शक्यता असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.