अभिनेता आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली . लालसिंग चढ्ढा चित्रपटावर बंदी आणण्यासाठी सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली होती. आमिर खाननेही वेळोवेळी प्रेक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला . चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान खूप दुःखी आहे. हे सुरु असतानाच आमिर खान काल दुपारी चारच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. आमिर जवळपास तासभर शिवतीर्थावर होता. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी आमिर खानच्या शिवतीर्थ भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.
राज ठाकरे नवीन इमारतीत रहायला गेल्यापासून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नवीन घराला भेट दिली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृतीही ठीक नव्हती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.