अभिनेत्री दीपाली सय्यदनेही कोल्हापूर जिल्हामधील भुदरगडचा केला दौरा
राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचा आढावा नेतेमंडळी घेत आहेत. यामध्ये अभिनेत्री दीपाली सय्यदनेही कोल्हापूर जिल्हामधील भुदरगड तालुक्यातील ग्रामीण भागात पूरग्रस्त भागाचा दौराक केला, या दौऱ्यादरम्यान नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर १० कोटींच्या मदतीची घोषणा दीपाली सय्यदने केली आहे. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांचे सांत्वनही त्यांनी केलं आहे. पूरग्रस्त भागाचा दौरा करताना नागरिकांच्या व्यथाही जाणून घेतल्या आहेत.
दिपाली सय्यद यांनी भुदरगड जिल्ह्यातील भागाचा दौरा करुन पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. दीपाली सय्यदकने माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, राज्यातील स्थिती भयंकर आहे. पूरग्रस्त बाधितांशी संवाद साधताना त्यांच्या व्यथा जाणून अंगावर काटा येत होता. लोक दुःख सांगताना रडत होते. प्रत्येक घराचं मोठ नुकसान झालं असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.
कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, सांगली या भागात मोठं नुकसान झालं आहे. महापूराचं चित्र डोळ्यानी पाहिले आहे. मागील दोन वर्षात कोरोना महामारीत कमाधंदा बंद आहे. गाव उदध्वस्त झाले असून हे बघताना फार भयानक वाटलं अजून आपली किती परीक्षा देव घेणार असं दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.