बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:07 IST)

शिवसेनेची संघटनात्मक निवडणुक औपचारिकता, आदित्य नेते

शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीची औपचारिकता मंगळवारी पार पाडली जाणार आहे. यात  आदित्य ठाकरे यांना नेते म्हणून बढती मिळणार आहे. याशिवाय पक्षात नव्या पदांची निर्मिती केली जाणार आहे. राजकीय ठरावांमध्ये भाजपला लक्ष्य केले जाणार आहे. एकहाती सत्ता हे आगामी काळात शिवसेनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.
 
राजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. त्यानुसार पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पार पाडली जाणार आहे. या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती मिळणार आहे. ठाण्यातील प्रभावशाली नेते एकनाथ शिंदे आणि आमदार अनिल परब यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. पक्षात नव्या पदांची निर्मिती केली जाणार आहे. त्यानुसार मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके आदी नेत्यांवर मार्गदर्शकाची वेगळी जबाबदारी सोपविली जाईल.