बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (09:20 IST)

ॲड. आशा शिरसाठ ‘सुषमा स्वराज’ पुरस्काराने सन्मानित

Strishakti Honor Ceremony 2024
चाळीसगाव : मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात कार्यरत ॲड.आशा शिरसाठ-गोरे यांना भारतीय जनता पार्टी प्रणित महिला मोर्चातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘स्त्रीशक्ती सन्मान सोहळा २०२४’ कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ‘सुषमा स्वराज अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
 
तसेच जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजी नगर येथे तेली सेना व तिळवण तेली समाजातर्फे आयोजित ‘सन्मान नारीशक्तीचा’ कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तबगार महिला म्हणून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील अनेक मान्यवरांनी तसेच समाज बांधवांनी ॲड.आशा शिरसाठ-गोरे यांचे कौतुक केले आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor