शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (08:24 IST)

आदित्यनंतर आता उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर

uddhav thackeray
राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ते सभा घेत आहेत.
 
आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेही महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरवात मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यापासून होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र मोहिम जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर ‘महाप्रबोधन यात्रा’ सुरु होणार आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावर पहिली सभा होणार आहे. हा भाग शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची यात्रा जाणार आहे. यात्रेची सांगता कोल्हापुराच्या बिंदू चौकात होणार आहे.