बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (09:07 IST)

नाशिकनंतर नागपूरमध्ये नायलॉनच्या मांजाने घेतला तरुणाचा बळी

नागपूरमध्ये नायलॉनच्या मांजाने  गळा कापल्याने एका 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना रामबाग परिसरात घडली आहे. हा तरुण दुचाकीवरुन जात असताना रस्त्यावर लटकणारा मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला. काही कळायच्या आत तरुणाचा गळा कापला गेला आणि यातच उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. 
 
याधीही नाशकात एका महिलेचा मांजा कापल्याने मृत्यू झाला होता. तर एका व्यक्तीच्या गळ्याला 7 टाके पडले होते. डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये नायलॉन दोऱ्यामुळे महिलेचा मृत्यू झाला होता. दुचाकीवरून घरी जात असताना नायलॉनमांजामुळे गळ्याला गंभीर दुखापत होऊन महिलेचा गाडीवरून पडून मृत्यू होता. सातपूर येथून कामावरून दुचाकीवर घरी जात असताना नाशिकच्या द्वारका पुलावर ही घटना घडली होती.